Home > News Update > #किसान#भारत बंद - स्वाभिमानीचे रेल्वे रोको

#किसान#भारत बंद - स्वाभिमानीचे रेल्वे रोको

#किसान#भारत बंद - स्वाभिमानीचे रेल्वे रोको
X

नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला विविध ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय. या बंदमध्ये सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील भल्या सकाळीच रेल रोको करून आंदोलन सुरू केलेले आहे.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई - अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली . दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 6.40 वा. चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Updated : 2020-12-08T09:55:06+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top