Home > News Update > भारत जोडो यात्रेला समाजिक विचारवंताचं बळ.

भारत जोडो यात्रेला समाजिक विचारवंताचं बळ.

भारत जोडो यात्रेत नर्मदा बचाव आंदोलनात्यातील मेधा पाटकर, महात्मा गांधीचे पणतू ज्येष्ठे विचारवंत तुषार गांधी, अंधश्रद्धा समितीचे अध्यक्ष श्याम मानव, तसेच ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर इत्यादी समाजिक विचारवंत यात्रेत उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी देखील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेला समाजिक विचारवंताचं बळ.
X

राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली. आता सध्या पदयात्रा महाराष्ट्रात असल्याने अनेक शेतकरी, महिला, दिव्यांग. तरुण, वयवृध्द लोक सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांची यात्रा अकोला जिल्ह्यात येणार असल्याने नर्मदा बचाव आंदोलनात्यातील मेधा पाटकर, महात्मा गांधीचे पणतू ज्येष्ठे विचारवंत तुषार गांधी, अंधश्रद्धा समितीचे अध्यक्ष श्याम मानव, तसेच ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर इत्यादी विचारवंत उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी देखील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

या यात्रेचा मुक्काम आज पातूर येथे होणार असून, उद्या यात्रा बाळापूरकडे रवाना होईल. सामाजिक विचारवंतांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याला लोकांना काय आश्वासन देणार आहेत. ते पाहावं लागणार. तसेच वनविभागाच्या मार्गांवर राहुल गांधी मोटार कारने प्रवास करणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येते आहे. या यात्रेमुळे पर्यावरणातील वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते पातुरपर्यंतचा १६ किलो मीटरचा प्रवास राहुल गांधी वाहनाद्वारे करतील अशी माहिती काँग्रेसने दिली.

Updated : 16 Nov 2022 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top