Home > News Update > केंद्रीय कृषी कायद्यांना एक वर्ष पूर्ण, शेतकऱ्यांची सोमवारी भारत बंदची हाक

केंद्रीय कृषी कायद्यांना एक वर्ष पूर्ण, शेतकऱ्यांची सोमवारी भारत बंदची हाक

केंद्रीय कृषी कायद्यांना एक वर्ष पूर्ण, शेतकऱ्यांची सोमवारी भारत बंदची हाक
X

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांनी दिल्लीच्या (Delhi)सीमेवर सुरु केलेल्या आंदोलनाला आता अनेक महिने उवलटून गेले आहेत. २७ सप्टेंबर रोजी या कायद्यांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर १ वर्ष पूर्ण होत आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने उद्या म्हणजेच सोमवारी भारत बंदची(Bharat Bandh) हाक दिली आहे. या बंदला काही सामाजिक संघटनांसह काही राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. पंजाबचे(Punjab) नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. तर बिहारचे(Bihar) विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश,(Andhra pradesh) तामिळनाडू(Tamilnadu) सरकारांनाही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. तर काँग्रेस (Coongress)देखील या बंदमध्ये सहभागी होऊन आंदोलन करणार आहे. केरळमधील (kerala)सरकारनेही या बंदला पाठिंबा दिला आहे.

सकाळी ६ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं, शैक्षणिक संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमही न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.

Updated : 2021-09-26T17:57:40+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top