आपण पाकिस्तान होत चाललो आहोत : भालचंद्र नेमाडे

Courtesy : Social Media

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर एकीकडे लोक रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे या कायद्याच्या विरोधात लेखक, दिग्दर्शक, गीतकार, कलाकार यांनी देखील बोलायला सुरुवात केली आहे.

नुकताच मुंबईत अमर उजाला सन्मान सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, गीतकार गुलजार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी राहिलेल्या भालचंद्र नेमाडे यांनी या कायद्यावर भाष्य करताना सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

हे ही वाचा

हिंदू कादंबरीचा दुसरा भाग 6 महिन्यात वाचकांना मिळेल – भालचंद्र नेमाडे
कर्जमाफी योजना मागे घ्या – विजय जावंधिया
CAA : पोलिस अधिकारीच आंदोलकांना म्हणतात, पाकिस्तानात जा!

“हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.”

असं म्हणत सरकारला सल्ल्या देण्याची गरज नाही. त्यांना अशा सल्ल्यांची गरज नसते. त्यांचं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर ठरलेलं असतं, असं म्हणत सरकार कोणाचंही ऐकत नाही याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधलं. हा घाणेरडा धंदा…
“सर्वसामान्य माणसाने आपलं आयुष्य नीट काढावं इतकीच आपली अपेक्षा असते.

हा घाणेरड्या लोकांचा उद्योग असतो. चांगल्या लोकांना यात घालू नये असं मला वाटतं. खरं म्हणजे हा विषय इतका विद्यार्थ्यांपर्यंत जाणं हेही चूकीचं आहे. हे ठराविक तज्ञ लोकांनी सोडवावे असे प्रश्न आहेत. दुर्दैवाने लोक रस्त्यावर यायला लागली आहेत. त्यामुळे सर्वांनीच आपली कामं सोडून या घाणेरड्या धंद्यात पडा, असा हा उद्योग झाला आहे.”