Home > News Update > इथे माणुसकी हरवली..! रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा पोलिसांसमोर हंबरडा; तरीही पोलीसांनी केली कारवाई

इथे माणुसकी हरवली..! रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा पोलिसांसमोर हंबरडा; तरीही पोलीसांनी केली कारवाई

इथे माणुसकी हरवली..! रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा पोलिसांसमोर हंबरडा; तरीही पोलीसांनी केली कारवाई
X

बीड जिल्हा प्रशासनाकडून अंबाजोगई आणि बीडमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच अँटीजेन टेस्ट केली जात आहे. आजपासून या कारवाईला सुरूवात झाली. मात्र, पोलीस प्रशासनाकडून होणारी कारवाई माणुसकी विसरली आहे का.? असा सवाल निर्माण झाला आहे.

त्याच कारण ही तसंच आहे. रुग्णालयामध्ये आपल्या आईच्या उपचाराचे पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या महिलेला बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबवण्यात आलं. यावेळी ही महिला देखील पोलिसांच्या कारवाईस सहकार्य म्हणून थांबली. या दरम्यान या महिलेने रुग्णालयात जात असल्याचे सांगितलं. मात्र, महिला पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

यावेळी या महिलेने पोलिसांसमोर हंबरडा फोडला तरी देखील पोलिसांना तिची दया आली नाही. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून केली जाणारी कारवाई योग्यच आहे.

या व्हिडिओत आपण पाहू शकता ही महिला पोलिसांना विनवण्या करते, विव्हळत आपल्या व्यथा मांडतेय तरी देखील पोलिसांनी तिच्यावर कारवाई केलीच. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास प्रशासनाची परवानगी आहे. मात्र, योग्य कारण सांगून देखील या महिलेवर केलेली कारवाई कितपत योग्य आहे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

Updated : 5 May 2021 6:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top