Home > News Update > Beed Loksabha | जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार... ज्योती मेटे यांचं आव्हान...!

Beed Loksabha | जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार... ज्योती मेटे यांचं आव्हान...!

Beed Loksabha | जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार... ज्योती मेटे यांचं आव्हान...!
X

मराठा आरक्षणासह सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्तावर उतरून संघर्ष करणारे दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे या बीड लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. बीडच्या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांच्याऐवजी बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करत शरद पवार गटाने त्यांचा पत्ता कट केला . त्यामुळे ज्योती मेटे आता बीड लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील असा दावा केला जात आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारल्यानंतर यासंबंधी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचं ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे. याप्रकरणी कार्यकर्त्यांनी विश्वासात घेऊन पुढील पावले उचलली जातील, असं ज्योती मेटे याविषयी बोलताना म्हणाल्या.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला तर या ठिकाणी तिरंगी लढत होऊन त्याचा फटका प्रमुख पक्षांना बसण्याची भीती आहे. ज्योती मेटे यांनीही आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. एकदा शर्यतीत उतरल्यानंतर जिंकण्यासाठीच उतरावे या मानसिकतेची मी आहे, असे ज्योती मेटे याविषयी बोलताना म्हणाल्या, पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला तर या ठिकाणी तिरंगी लढत होऊन त्याचा फटका प्रमुख पक्षांना बसण्याची भीती आहे. ज्योती मेटे यांनीही आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. एकदा शर्यतीत उतरल्यानंतर जिंकण्यासाठीच उतरावे या मानसिकतेची मी आहे, असे ज्योती मेटे याविषयी बोलताना म्हणाल्या.

Updated : 6 April 2024 3:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top