Top
Home > News Update > लसीकरण: उन्हाच्या तडाख्यात ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडताय़ेत, ज्येष्ठांना घरीच लस द्या

लसीकरण: उन्हाच्या तडाख्यात ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडताय़ेत, ज्येष्ठांना घरीच लस द्या

लसीकरण: उन्हाच्या तडाख्यात ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडताय़ेत, ज्येष्ठांना घरीच लस द्या
X

बीड जिल्ह्यातील परळीमध्ये कोविड 19 च्या लसीकरण केंद्रावर आज सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, या केंद्रावर काही जेष्ठ नागरिक उन्हाच्या तडाख्यात चक्कर येऊन पडले आणि लसीकरण केंद्रावर एकाच गोंधळ उडाला. त्यामुळं सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी लसीकरण करण्याचं नियोजन करावं अशी मागणी समोर येत आहे.

यावेळी सोशल डिस्टनसिंगचा पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र पाहवयास मिळाले. तर हा गोंधळा सावरण्यासाठी परळीच्या तहसिलदारांनी तात्काळ लसीकरण केंद्राला भेट दिली. दरम्यान शहरातील माळीवेस येथील लसीकरण केंद्रावर, आज दुपारपर्यंत तब्बल 400 च्या वर लस देण्यात आल्या असून आणखी 200 लस देणे बाकी असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी मोरे यांनी माहिती दिलीय.

Updated : 4 May 2021 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top