Home > News Update > भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...!

भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...!

भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...!
X

बीड येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली. बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपाधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप, ग्रामिण पोलीस ठाण्याचे संतोष साबळे, पेठ बीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी धाव घेतली. बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांसह भाजप पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Updated : 11 Oct 2022 8:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top