Home > News Update > कोरेगाव भीमा विकास आराखडा: दलितांच्या गळ्यात मडके आणि पाठीमागे खराटा लावलेली प्रतिकृती उभारा: सचिन खरात

कोरेगाव भीमा विकास आराखडा: दलितांच्या गळ्यात मडके आणि पाठीमागे खराटा लावलेली प्रतिकृती उभारा: सचिन खरात

कोरेगाव भीमा विकास आराखड्यात दलितांच्या गळ्यात मडके आणि पाठीमागे खराटा लावलेली प्रतिकृती उभारण्याची सचिन खरात यांची मागणी, सरकार मान्य करणार का? वाचा

कोरेगाव भीमा विकास आराखडा: दलितांच्या गळ्यात मडके आणि पाठीमागे खराटा लावलेली प्रतिकृती उभारा: सचिन खरात
X

सध्या कोरेगाव भीमा च्या विकास आराखड्याचे काम सुरु आहे. या आराखड्यात पेशवाईच्या काळात दलित समाजाला जी शूद्र म्हणून अमानवीय, मानवजातीला कलंकित करणारी, विषमतेला खतपाणी घालणारी, वागणूक दिली. दलितांच्या गळ्यात मडके आणि मागे खराटा बांधला गेला. जगात गुलामाला सुद्धा अशी वागणूक मिळाली नव्हती. म्हणून येणाऱ्या लाखो पिढ्यांना इतिहास समजण्यासाठी आणि पुढे असे अमानवीय कृत्य न करण्यासाठी धडा घ्यावा. यासाठी जो कोरेगाव भीमा चा आराखडा तयार होत आहे. त्यात दलितांच्या गळ्यात मडके आणि मागे खराटा अशी प्रतिकृती उभारावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे (खरात गट) सचिन खरात यांनी केली आहे.

1817-18 मध्ये पेशव्याच्या सैन्यात असणाऱ्या सिदनाक या दलित योद्धाने पेशव्यांना आमच्या समाजावरील अन्याय दूर करावा. अशी विनंती केली होती. मात्र, पेशव्यांनी हेटाळणी केल्यावर सिद्नाक यांच्या सैनिकांनी बंड केले.

पुढे 1 जानेवारी 1818 मध्ये या सैनिकांनी भीमाकोरेगाव येथे पेशव्यांच्या 28,000 हजार सैनिकांचा पराभव करून पेशवाई संपविली. ही लढाई सत्ता किंवा राज्य मिळविण्यासाठी नव्हती. विषमतेविरुद्ध समानता मिळविण्यासाठी आणि मानवमुक्तीची लढाई होती.

त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली मानवंदना महान योध्यांना दिली. आणि जगाला ओरडून सांगितले जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही.

Updated : 3 Jan 2021 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top