Home > News Update > राकेश टिकैत यांचा अंजना कश्यपवर वार, म्हणाले... 'आप तो BJP वालों की प्रिंसिपल बन रहीं है...'

राकेश टिकैत यांचा अंजना कश्यपवर वार, म्हणाले... 'आप तो BJP वालों की प्रिंसिपल बन रहीं है...'

राकेश टिकैत यांचा अंजना कश्यपवर वार, म्हणाले... आप तो BJP वालों की प्रिंसिपल बन रहीं है...
X

भारतीय किसान युनियनचे (BKU) प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान टीव्ही अँकर अंजना ओम कश्यपला तुम्ही भाजपच्या प्रिंसिपल बनत आहात. असा आरोप केला. यावर अँकरने "तुम्ही तुमच्या भूमिकेत राहा" असं उत्तर दिलं आहे.

अंजना ओम कश्यप ने "पंचायत आज तक यूपी" या कार्यक्रमात टिकैत यांची मुलाखत सुरु होती. या मुलाखती दरम्यान अँकर अंजना ओम कश्यप यांनी, शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी... कोण म्हटलं की हे राजकीय आंदोलन आहे? तुम्ही कोणत्या पक्षाबद्दल बोलत आहात? तुम्ही कोणाच्या मोठ्या - मोठ्या जाहिराती छापल्या... काय छापलं "अबकी बार मोदी सरकार"?

हे सरकार भाजपचे असते तर आम्ही बोललो असतो. हे मोदी सरकार आहे, जे कंपनी चालवते. हे भाजपचे सरकार नाही. कुठे आहेत त्यांचे नेते ?

टिकैत म्हणाले, "देशातील सर्व कॅमेरे आणि लेखणीवर बंदुकीची नजर आहे. कोणीही बोलण्याची हिंमत करत नाही. सर्व व्यापारी संपले, कुठे जाईल देश? आज प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. दरम्यान, अंजना कश्यप म्हणाल्या की, तुमचा आवाज आजतकच्या माध्यमातून पुढे जात आहे. यावर टिकैत म्हणाले की, तुम्ही तर भाजपच्या प्रिंसिपल बनत आहात. टिकैतच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

मात्र, यावर अँकरने चोख प्रत्युत्तर दिले. टिकैत साहेब, तुम्हाला असं वाटतं का, की तुम्ही ओरडून आणि काहीही बोलून एखाद्याचा अपमान कराल आणि मोठे व्हाल? आज तकच्या मंचावर आम्ही तुम्हाला बोलावलं प्रश्नाची उत्तरं द्यायला. तुम्ही तुमच्या भूमिकेत रहा. प्रिंसिपल तुम्ही बनत आहात. निःपक्षपाती भूमिका बजावणारी माध्यमं तुम्हाला स्टेजवर बोलावतात, जेणेकरून तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्यावी. त्यामुळे तुम्ही त्याचं भूमिकेत रहा. असं उत्तर अंजना यांनी राकेश टिकैत यांना दिलं आहे.

Updated : 2021-08-09T14:21:13+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top