Home > News Update > बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई... व्हिडिओ क्लिप अंगाशी...

बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई... व्हिडिओ क्लिप अंगाशी...

बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई... व्हिडिओ क्लिप अंगाशी...
X

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा याला आपल्या पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. चेतन शर्मांची बीसीसीआयने त्याच्या पदावरुन गच्छंती केली आहे. वादग्रस्त व्हिडिओ क्लिप शर्माला भोवली असल्याचे बोलले जात आहे. शर्मा याने आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. जय शहा यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

भारताचा माजी फिरकी गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई करत त्यांना त्यांच्या पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. शर्मा यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्विकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने भारतीय संघ आणि खेळाडूंशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यानंतर तो सतत वादात सापडला होता. आता त्याने भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोडले आहे. शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी आणि वन डे मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामान्यांसाठी निवड समितीची बैठक आता अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत खळबळजनक खुलासे केले होते. या खुलासानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. या खुसालामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची मान शरमेने खाली गेली. त्यामुळे बीसीसीआयने हे प्रकरण गांभिर्यांने घेत चेतन शर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. एका टिव्ही चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या नात्यापासून के खेळाडूंना इंजेक्शन घेण्यापर्यंत अनेक बाबींवर गंभीर खुलासे केले होते. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जेव्ही ८० टक्के तंदुरूस्त असतात मात्र ते जेव्हा इंजेक्शन घेतात तेव्हा ते १०० टक्के तंदुरुस्त होतात. याबाबत खुलासा चेतन शर्मा यांनी करताच भारत क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप चाचणीत आढळत नसल्याचा खुलासा शर्मा यांनी केला. त्यामुळे भारतीय संघाची बदनामी केल्याचा ठपका शर्मावर यांच्यावर ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

चेतन शर्मा यांने आपल्या या संभाषणामध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोप केला आहे. विराट कोहली याला सौरव गांगुलीमुळे आपले कर्णधारपद गमवावे लागल्याचा आरोप शर्मा यांनी या स्टिंगमध्ये केला आहे. पण तसे घडले नसल्याचा खुलासा निवड समितीने केला आहे, कारण निवड समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बरेच सदस्य असतात. या स्टिंग ऑपरेशनमध्ये मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांने अनेक वादग्रस्त खुलासे केल्याने बीसीसीआयने शर्मा यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कोणत्याही खेळाडूला आणि अधिकाऱ्याला बोर्डासोबत करार करताना नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे बोर्डाकडे असतात. त्या अधिकारानुसार शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

चेतन शर्मा यापूर्वीही अनेकदा वादत सापडले आहेत. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर चेतन शर्माच्या नेतृत्त्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत हरला आणि निवड समितीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र यावर्षी त्यांची मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. शर्मा व्यतिरिक्त, शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या नविन वरिष्ठ निवड समितीचे इतर चार सदस्य आहेत. चेतनच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्यांचे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.

चेतन शर्मा हे दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष झाले होते. ७ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी पुन्हा एकदा या पदाचा पदभार स्विकारला होता. मात्र यावेळी त्यांचा कार्यकाळ फक्त ४० दिवसांतच संपुष्टात आला आहे. पहिल्या टर्ममध्ये बीसीसीआयने टी-२० वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर संपूर्ण समिती बरखास्त केली होती. महत्त्वाचे म्हणजे चेतन शर्मा यांना आपल्या दोन्ही टर्ममध्ये आपले पद गमवावे लागले होते.

Updated : 17 Feb 2023 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top