Home > News Update > पवार कुटुंबाची खास दिवाळी...!

पवार कुटुंबाची खास दिवाळी...!

पवार कुटुंबाची खास दिवाळी...!
X

संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यात सर्वात अग्रगण्य असतात. बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय एकत्र येऊन पाडव्याचा दिवस सगे सोयरे.. कार्यकर्ते आणि पक्षातील नेते यांच्यासाठी देत असतात.

गेल्या अनेक वर्षापासुन चालु असलेल्या या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच एका दिवसात हजारो कार्यकर्ते भेट देऊन जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या निकालापासुन अजित पवार हे अज्ञातवासात होते ते थेट आज गोविंदबाग येथे दिवाळीसाठी आले आहेत.

https://youtu.be/ZTFF_B_gc9s

Updated : 28 Oct 2019 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top