बीडच्या तांदळा गावातील साखळी उपोषणाचे पोलीस प्रशासनाकडून बॅनर काढले
X
Maratha Reservation Beed News : बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा या गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण चालू असल्याचे बॅनर गावाच्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आले होते मात्र हे बॅनर पोलीस प्रशासन यांच्या वतीने काढण्यात आले आहेत पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की आम्हाला वरून आदेश आले आहेत की साखळी उपोषण गाव बंदी बॅनर काढा असे आदेश आले आहेत असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन हे बॅनर काढून बाजूला ठेवत आहेत मात्र नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
त्याचबरोबर बीडमध्ये मराठा समाज बांधवांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला कि, प्रत्येक गावातून पाच उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार व इतर समाजालाही मराठा समाज घेणार सोबत घेणार त्यामुळे आता निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान असणार आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच असणार मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
मराठा समाजाचा एकही व्यक्ती राजकीय पुढार्यांच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या मंचावर जाणार नाही एकमताने ठराव.आगामी लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही शनी लागू शकतात मात्र या निवडणुकीमध्ये आता मराठा समाज देखील उतरणार असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलेली मराठा कुणबी ची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावातून पाच उमेदवार देऊन सरकारला आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवणार असल्याचे या बैठकीत एकमताने ठराव घेण्यात आला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाणार नाही किंवा कुठल्याही सभेला जाणार नाही असे देखील या बैठकीत मराठा बांधवांच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.