Home > News Update > कुठे सुरु आहेत न्यायालयाचा अवमान करुन रेड्यांची टक्कर...

कुठे सुरु आहेत न्यायालयाचा अवमान करुन रेड्यांची टक्कर...

कुठे सुरु आहेत न्यायालयाचा अवमान करुन रेड्यांची टक्कर...
X

सर्वोच्च न्यायालयाने रेड्यांच्या टक्करीवर बंदी घातलेली असताना सुद्धा नांदेड जिल्ह्यात रेंड्याच्या टक्करीचा थरार पहायला मिळतोय. मुदखेड तालुक्यातील वासरी येथे रेड्यांची टक्करीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होताना दिसून आले. न्यायालयाचा आदेश डावलून येथे रेड्याच्या टक्करी घेण्यात आल्या. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नांदेडसह हिंगोली, परभणी जिल्ह्यातील रेडे दाखल झाले होते. रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी इथे मोठ्याप्रमाणात गर्दी सुद्धा झाली होती. दरम्यान, बंदी असतानाही रेड्यांच्या टक्करीची स्पर्धा घेणाऱ्या आयोजकावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार आहे. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे या रेड्याच्या टक्करीवर लाखो रुपयांचा सट्टा सुद्धा लावला जातो. पोलिसांच्या नाकावर टिच्चून या टकरीचे आयोजन दरवर्षी केले जाते. या टकरीने कायद्याची लक्तरे वेशीवर टांगल्याचे चित्र यावेळी येथे पाहावयास मिळाले.

राज्यातील ग्रामीण भागात रेड्यांच्या टकरी लावण्याची प्रथा आहे. कायद्याने बंदी असल्याने आता अशा प्रकारच्या टक्कर जवळपास बंद झाल्या आहेत. मात्र नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वासरी येथे कायद्याची पायमल्ली करत आज रेड्याच्या टक्करी लावण्यात आल्या. या ठिकाणी परिसरातील जवळपास १० हून अधिक रेडे टक्करीसाठी आणले होते. ही टक्कर पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक सुद्धा उपस्थित होते. स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांच्या अशा टक्करी लावणे, हा कायद्याने गुन्हा असला तरी ही परंपरा अद्यापही प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरु आहे. हे कधी थांबणार...आणि मुक्या जनावरांवरील हे अत्याचार कधी थांबणार...हा प्रश्न पर्यावरणप्रेमी विचारत आहे.

Updated : 17 Jan 2023 1:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top