Home > News Update > बँक ऑफ महाराष्ट्रमधील रिक्त जागा भरण्यासाठी आंदोलन

बँक ऑफ महाराष्ट्रमधील रिक्त जागा भरण्यासाठी आंदोलन

बँक ऑफ महाराष्ट्रमधील रिक्त जागा भरण्यासाठी आंदोलन
X

बँक ऑफ महाराष्ट्रमधील रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांनी शनिवारी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 1271 शाखा सर्वत्र आहेत, परंतु आताही सर्व शाखांमध्ये सफाई कर्मचारी आणि लिपिकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. ही पदं भरण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करून लवकरात लवकर कनिष्ठ लिपिक व सफाई कामगारांची भरती करावी ही, अशी मागणी यावेळी करण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या काही दिवसांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच दिल्लीत जाऊन संबंधित मंत्र्यांची भेटसुद्धा घेणार असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने सांगण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर मराठी कामगार असून राज्य शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिले तर मराठी माणसांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल व त्यांचा उद्धार होईल असे सुद्धा यावेळी सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

Updated : 9 Oct 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top