Home > News Update > अमिताभ व अक्षय कुमार चे पिक्चर महाराष्ट्रात बंद पाडू: नाना पटोले

अमिताभ व अक्षय कुमार चे पिक्चर महाराष्ट्रात बंद पाडू: नाना पटोले

अमिताभ व अक्षय कुमार चे पिक्चर महाराष्ट्रात बंद पाडू: नाना पटोले
X

कॉंग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले आज अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचं अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं.

यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्च सह पदयात्रा याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रात अमिताभ बच्चन व अक्षय कुमार चे पिक्चर चालणार नाही व शूटिंग व देखील बंद पाडू असा इशारा दिला आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ, गॅसची दरवाढ यामुळं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं ज्यावेळी मनमोहन सिंह यांचं सरकार होतं. त्यावेळेस अभिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल हे टिवटिव करायचे. ट्विट च्या माध्यमातून टीका करायचे. आज ते गप्प का आहेत? महाराष्ट्रामध्ये अभिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा पिक्चर आणि शुटींग महाराष्ट्रात चालू देणार नाही.

असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. पाहा काय म्हटलंय नाना पटोले यांनी...


Updated : 2021-02-18T14:49:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top