Home > News Update > बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, ठाकरे बंधू एकत्र

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, ठाकरे बंधू एकत्र

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, ठाकरे बंधू एकत्र
X

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 95 वी जयंती. त्यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat), पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व अस्लम शेख (Aslam Shaikh), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

असा आहे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा?

बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच पुर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची उंची ९ फूट असून १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आहे. यासाठी सुमारे १२०० किलो ब्राँझ धातूचा वापर करण्यात आला आहे.

कोणी बांधला पुतळा?

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशन ने केली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा तयार केला आहे.

Updated : 23 Jan 2021 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top