Home > News Update > औरंगाबादच्या उद्योगाचं चक्र फिरणार; ८५० कर्मचाऱ्यांसह 'बजाज' आज होणार सुरू

औरंगाबादच्या उद्योगाचं चक्र फिरणार; ८५० कर्मचाऱ्यांसह 'बजाज' आज होणार सुरू

औरंगाबादच्या उद्योगाचं चक्र फिरणार; ८५० कर्मचाऱ्यांसह बजाज आज होणार सुरू
X

लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र थांबलं आहे. आपत्कालीन सेवा वगळता सर्व उद्योग बंद आहेत. अशा परिस्थितीत ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही किंवा तुलनेनं कमी आहे तिथे नियम व अटींसह उद्योग पुन्हा सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे.

औरंगाबादसह मराठवाड्याच्या उद्योगव्यवस्थेत महत्वाचं स्थान असलेली बजाज कंपनी आज सुरू होत आहे. बजाजमध्ये पहिल्या टप्प्यात ८५० कर्मचारी काम करणार आहेत. महत्वाचं म्हणजे बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करणारे इतर ५० छोटे उद्योगही २४ एप्रिलपासून सुरू होत असल्याचं समजतंय. त्यामुळे ठप्प असलेल्या औरंगाबाद उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बजाजमधील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ३२ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व कर्मचारी हे वाळूज महानगर परिसरातील आहेत. औरंगाबाद महापालिका हद्दीतील कर्मचारी कंपनीच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. बसमध्येही सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Updated : 24 April 2020 6:43 AM GMT
Next Story
Share it
Top