Home > News Update > न्यायालयातून मंत्र्यांविरोधातील पुरावे चोरीला...

न्यायालयातून मंत्र्यांविरोधातील पुरावे चोरीला...

न्यायालयातून मंत्र्यांविरोधातील पुरावे चोरीला...

न्यायालयातून मंत्र्यांविरोधातील पुरावे चोरीला...
X


आंध्रप्रदेश चे कृषी राज्यमंत्री काकानी गोवर्धन रेड्डी यांच्या विरोधात नेल्लोर येथील एका न्यायालयात मानहानी संदर्भात एक खटला सुरु आहे. या खटल्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयाच्या आवारात एका पिशवीत सुरक्षित ठेवण्यात आले होते. ही बॅग चोरीला गेल्याचे न्यायालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे.

इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भात वृत्त दिलं आहे. चोरीला गेलेल्या बॅगमध्ये एक लॅपटॉप, आयपॅड आणि तीन सेल फोन होते. या सर्व वस्तू मंत्री रेड्डी यांच्याशी संबंधित आहेत.

या संदर्भात न्यायालयीन लिपिकाने 13 एप्रिल ला स्थानिक पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केला आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या तिजोरीत घुसलेल्या सहापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरांनी वस्तू ताब्यात घेतल्या आणि रिकामी पिशवी कोर्टाजवळ फेकली. ताब्यात घेतलेल्या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे. आम्ही मुख्य आरोपींना लवकरच पकडू. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

डिसेंबर 2016 मध्ये तत्कालीन टीडीपीचे मंत्री सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांनी काकानी गोवर्धन रेड्डी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गोवर्धन रेड्डी यांनी सोमिरेड्डी यांच्यावर सिंगापूर, मलेशिया आणि थायलंडमध्ये 1,000 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप केला होता.

10 एप्रिल ला झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी गोवर्धन रेड्डी यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.


State Agriculture Minister Kakani Govardhan Reddy

या संदर्भात बोलताना सोमिरेड्डी म्हणाले,

"माझ्याकडून खरेदी केलेल्या मालमत्तेची तथाकथित कागदपत्रे त्यांनी सार्वजनिकरित्या सादर केली होती. मी त्यांना न्यायालयात त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान केले होते. त्यांनी सादर केलेले कागदपत्रं बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या वर्षी जानेवारीमध्ये वायएसआरसीपी सरकारने गोवर्धन रेड्डी यांच्यावरील खटला मागे घेण्यासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. प्रकरण जूनमध्ये सुनावणीसाठी सूचीबद्ध आहे.''

सोमिरेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, गोवर्धन रेड्डी यांच्या विरोधातील पुराव्याची बॅग नेल्लोर येथील न्यायालयात होती. फक्त ही इलेक्ट्रॉनिक पुराव्याची बॅगच चोरीला जाते ही आश्चर्याची घटना नाही का?

चोरीच्या बॅगेत प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याची पुष्टी एका पोलीस अधिकाऱ्याने केली आहे. या संदर्भात मंत्री गोवर्धन रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दरम्यान, टीडीपी लोकलेखा समितीचे अध्यक्ष पय्यावुला केशव यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना, न्यायव्यवस्थेने ही घटना गांभीर्याने घेतली पाहिजे. असं म्हटलं आहे. द वायर ने या संदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

Updated : 16 April 2022 2:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top