Home > News Update > स्वस्त पेट्रोलवरुन बाबा रामदेवांचे `पलटासन`

स्वस्त पेट्रोलवरुन बाबा रामदेवांचे `पलटासन`

स्वस्त पेट्रोलवरुन बाबा रामदेवांचे `पलटासन`
X

बाबा रामदेव आता स्वतःच्या विधानावर पलटले असून समाजमाध्यमांवर हे बाबांचे `पलटासन` असल्याचं ट्रोलींग सुर झालं आहे...

कॉंग्रेस सत्तेत असताना बाबा रामदेव यांनी काळा पैसा परत आणला तर पेट्रोल तीस रुपये होईल असं म्हटलं होतं. त्यावेळी अण्णा हजारेंसोबत त्यांनी काळ्या पैशाविरोधात देशव्यापी आंदोलन केलं होतं. गेल्या काही दिवसात पेट्रोलियन पदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यावरुन समाजमाध्यमात उद्रेक झाला आहे. रामदेव बाबांच्या ट्विट वरुन ट्रोलिंग झाल्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं. आता नागपूर येथे पत्रकारांनी त्यांना गाठल्यावर त्याविषयीचा प्रश्न केला परंतू बाबा रामदेव यांनी त्यावर गोलमोल उत्तर देऊन बाजू सावरण्याचा केविलवाना प्रयत्न केला. रामदेव बाबांचे हेच उत्तर आता सोशल मिडीयावर व्हायरल झालं आहे.

Updated : 24 Oct 2021 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top