Home > News Update > T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव केला

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव केला

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव केला
X

T20 : T20 World Cup 2021 अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव केला. मात्र,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी या सामन्यात काहीशी सुमार कामगिरी केली. पण फलंदाजीने ही कसर भरुन काढत एक मोठा आणि महत्त्वाचा विजय मिळवला. इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषक जिंकला आहे.

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या गप्टीलने धिम्यागतीने धावा करत 28 रन केले. पण केनने संपूर्ण डाव सांभाळत 48 चेंडूत 85 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. ज्यामुळे न्यूझीलंड 172 धावा करु शकला.

न्यूझीलंडने ठेवलेलं 173 धावांच आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहजच पार केलं. मात्र, कर्णधार फिंच 5 धावा बाद झाला. यावेळी खऱ्या अर्थाने अनुभवी वॉर्नरने मार्श सोबत डाव सांभाळला. वॉर्नर आणि मार्शने केवळ 35 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 82 धावा केल्या. आयपीएलमध्ये बेंचवर बसून राहिलेल्या वॉर्नरने अंतिम सामन्यात अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत संघाला खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने नेलं. सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. 4 चौकार आणि 3 षटकार लगावत त्याने अर्धशतकी खेळी केली. तर सर्वाधिक धावा मिशेल मार्शने केल्या. त्याने 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. याशिवाय वॉर्नर बाद झाल्यानंतर खेळायला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 28 धावा करत संघाचा विजय पक्का केला. न्यूझीलंडकडून केवळ बोल्टने 2 विकेट घेतल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला

Updated : 15 Nov 2021 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top