Home > News Update > ब्रिस्बेनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली

ब्रिस्बेनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली

ब्रिस्बेनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली
X

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटी आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडचा २७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी घेतली आहे. यजमानांनी याआधी ब्रिस्बेन कसोटीत पाहुण्या इंग्लंडवर ९ गडी राखून विजय मिळवला होता. अ‍ॅडलेडमध्ये हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला गेला आहे. दरम्यान या विजयासह ऑस्ट्रेलियाने डे-नाईट कसोटीत १०० टक्के विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ४६८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र, इंग्लंडचा संघ त्या लक्ष्यापासून खूपच दूर दिसत होता. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १९२ धावांमध्ये आटोपला. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने ४२ धावांमध्ये ५ बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. मायकेल नेसरला एक विकेट मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. ख्रिस वोक्सने ४४ धावा केल्या. यष्टीरक्षक जोस बटलरने २०७ चेंडू खेळत केवळ २६ धावा केल्या.

Updated : 20 Dec 2021 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top