Home > Max Political > औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट, भाजपला फायदा!

औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट, भाजपला फायदा!

औरंगाबाद जि.प.अध्यक्षपद काँग्रेसकडे, उपाध्यक्ष भाजपाचा, नक्की काय घडलं? ते फुटलेले दोन सभासद कोणत्या पक्षाचे? कोणी महाविकास आघाडीला दगा दिला?

औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट, भाजपला फायदा!
X

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ‘महाविकास आघाडी’त बिघाडी झाल्यानं उपाध्यक्ष पद भाजपला गेले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्याबळ २३ भाजपकडे आहे. मनसे १, डेमोक्राटीक १ असे इतर पक्षीय बलाबल आहे. जर महाविकास आघाडीचा विचार केला तर, शिवसेना-१८, काँग्रेस-१६, राष्ट्रवादी -३ असं एकूण ३७ जिल्हा परिषद सदस्याची मत महाविकास आघाडीकडे होती. मात्र, ही मत महाविकास आघाडीला मिळाली का? तर नाहीत.

महाविकास आघाडी आणि भाजपला 30-30 अशी समान मत मिळाली. त्यामुळं ही मत फुटली का तर निश्चित फुटली. मात्र, 30-30 अशी समान मत मिळाल्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीमध्ये काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली.

मात्र, उपाध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत वेगळीच स्थिती पाहायला मिळाली. अध्यक्षाच्या निवडणुकीत दोन सदस्यांनी आपलं मत भाजपच्या पारड्यात टाकल्यानं भाजपच्या उपाध्यक्षपदी लहानू गायकवाड यांची निवड झाली आहे.

त्यामुळं महाविकासाघाडीची दोन मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाला ३२ व शिवसेनेच्या उमेदवाराला २८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा

स्मशानभूमीत घर बांधून दिलं तरी हरकत नाही- बच्चू कडू

बीड. जि.प. निवडणुकीत भाजपची ३ मतं फुटली. पंकजा मुंडेंना धक्का

८ जानेवारीला ग्रामीण भारत बंदची हाक

शिवसेनेचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

"सत्तारांच्या लोकांचं मतदान औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मिळालं नाही, त्यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत. ते भाजपकडे का गेले. त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. मी उद्धव ठाकरे यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांना हाकलून द्यावं,"

अशी टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

Updated : 4 Jan 2020 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top