Home > News Update > "बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो";खंडपीठाकडून विखेंची कानउघडणी

"बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो";खंडपीठाकडून विखेंची कानउघडणी

सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रूग्णांसाठी गुपचूप दिल्लीतून रेमडेसीवीर इंजेक्शन आणून वाटप केले होते.

बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो;खंडपीठाकडून विखेंची कानउघडणी
X

आपल्या मतदारसंघात परस्पर रेमडेसीवीर इंजेक्शनचा वाटप करणारे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत चांगली वाढ होताना दिसत आहे. तर 'गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही' अशा शब्दांत न्यायालयाने विखेंना फटकारून काढले.

सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रूग्णांसाठी दिल्लीतून रेमडेसीवीर इंजेक्शन आणून वाटप केले होते. त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर देशासह राज्यात तुटवडा असताना विखे यांनी गुपचूप रेमडेसीवीर इंजेक्शन आणून वाटप केल्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

यावर आज झालेल्या सुनावणीवेळी, "तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करत असताना बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो", अशा शब्दांत न्यायमूर्ती घुगे यांनी सूजय विखेंची कानउघडणी केली.

रेमडेसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर त्याचा व्हिडीओ करून,जो ड्रामा केला ते करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असे खडेबोलही न्यायमूर्तींनी सुनावले.

Updated : 4 May 2021 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top