Home > News Update > रंग रंगोटीतून बदलले शहराचे चित्र...

रंग रंगोटीतून बदलले शहराचे चित्र...

राज्यातील विविध शहरांचे आता रुपडे पालटू लागले आहे. शहरातील विविध शासकीय भिंती, जिल्हा प्रशासनाची कार्यालये, मनपा इमारत यांची रंगरंगोटी सुरु आहे. औरंगाबाद शहराला जी-२० परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करण्याचे काम प्रशासन करत आहे.

रंग रंगोटीतून बदलले शहराचे चित्र...
X

औरंगाबाद शहराला जी-२० परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करण्याकरता जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व इतर शासकीय कार्यालय जोमाने कामाला लागले असून औरंगाबाद शहराचा यामध्ये कायापालट होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग, घाण पडलेली दिसायची त्या ठिकाणी आज कलावंत कलाकारांना बोलवून भिंतीवर चित्र रेखाटल्यामुळे शहराचे रूप बदलले आहे. स्थानिक कलाकारांना या जी-२० मुळे रोजगार मिळाला असून, यामध्ये आम्हाला आमची कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठही मिळाले असल्याचे चित्र काढणाऱ्या कलावंतांनी सांगितले आहे.

जी-२० मुळे शहरातील शासकीय भिंतीचा कॅनव्हास म्हणून उपयोग केलेला आहे. या भिंतीवर आमची कला सादर करून आम्ही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहोत. जी ट्वेंटी च्या माध्यमातून आम्हाला एक प्लॅटफॉर्म सुद्धा मिळाला आहे. व प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही यामध्ये शंभर पेक्षा जास्त चित्रकार मुली-मुले सहभागी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया चित्रकार कलावंत यांनी दिली आहे.

Updated : 23 Feb 2023 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top