Home > News Update > पाण्याच्या टाकीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पाण्याच्या टाकीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पाण्याच्या टाकीवर चढून युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातारा येथून समोर आली. कौटुंबिक वादामुळे युवकाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाण्याच्या टाकीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
X

सातारा नागरपालिके समोरील पाण्याच्या टाकीवर चढून गुरुवार पेठ येथे राहणाऱ्या शुभम चव्हाण याने शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला सुखरूप खाली उतरवण्यात यश आले आहे.

4 दिवसांपूर्वी शुभमचे लग्न झाले असून कौटुंबिक वादामुळे मानसिक ताण निर्माण झाल्याने पाण्याच्या टाकीवर चढून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पोलिसांनी शुभम चव्हाण याचे समुपदेशन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांनी सांगितलं आहे.

Updated : 29 Aug 2021 5:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top