Home > News Update > माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न
X

अहमदनगर: महाराष्ट्रात महावितरण प्रशासनाकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरु आहे. या विरोधात भाजपचे नेते ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. दरम्यान नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाची वीज जोडणी महावितरणकडून सर्रास खंडित करत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

आधीच नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिलं झाला आहे. त्यातच वीज बिल सक्तीची वसुली सुरू आहे. याबाबत बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली. मात्र, महावितरण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासे महावितरण कार्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न करताच त्यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. नेवासे भाजपचे शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली. मात्र, यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी थांबविले. त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे ही उपस्थित होते. बाळासाहेब मुरकुटे यांचा स्वास रोखल्यामुळे त्यांना नेवासे येथील स्वास्थ्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Updated : 23 Nov 2021 3:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top