Home > News Update > "...तालिबानी स्टाईलने हल्ला करा", भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

"...तालिबानी स्टाईलने हल्ला करा", भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Attack TMC leaders in Talibani style, Tripura BJP MLA’S CONTRVERTIAL STATEMENT

...तालिबानी स्टाईलने हल्ला करा, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
X

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानच्या जुलमी विचारसरणीची चर्चा सर्वत्र असताना आता भाजपच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. "तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर तालिबानच्या स्टाईलने हल्ले करा " असे धक्कादायक वक्तव्य त्रिपुरामधील भाजपचे आमदार अरुण चंद्र भौमिक यांनी केले आहे.

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भौमिक यांनी हे वक्तव्य केले आहे. "ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरुन तृणमूल काँग्रेसचे नेते बिप्लव देव यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्य़ामुळे आपल्याला तृणमूलच्या लोकांवर तालिबानच्या स्टाईलने हल्ला करावा लागेल. ते विमानतळावर उतरताच आपल्याला त्यांच्यावर हल्ला करावा लागेल. रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत आपण सरकारच्या संरक्षणार्थ लढू" असे प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केले आहे.

भाजप सरकारच्या काळात त्रिपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती. पण त्यांची गुंडगिरी आम्हाला रोखू शकत नाही. येत्या काळात तृणमूल काँग्रेस त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करेल असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर भाजप आणि तृणमूलमधला संघर्ष आता आणखी गंभीर झाला आहे.

Updated : 19 Aug 2021 5:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top