मिरा-भाईंदरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला
X
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये ठाण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इथे अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये अधिकाऱ्याला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिम बॉम्बे मार्केटजवळ रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर मोठ्या संख्येने फेरीवाले बसत असतात. रविवारी सायंकाळी फेरीवाले पथक त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाला पाहून त्या ठिकाणी उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले आणि चक्क एका फेरीवाल्याने कारवाईला विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केला.
यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दल कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांत बाचाबाची झाली.
याबाबत तक्रारदार पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे






