Home > News Update > मॅरेथॉनमुळे अटल सेतू तब्बल १० तासांसाठी बंद

मॅरेथॉनमुळे अटल सेतू तब्बल १० तासांसाठी बंद

मॅरेथॉनमुळे अटल सेतू तब्बल १० तासांसाठी बंद
X

मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी सागरी अटल सेतू तब्बल १० तासांकरीता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रविवारी मॅरेथॉन होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक पोलीसांकडून करण्यात आलं आहे.

नागरीकांचं आकर्षण ठरलेल्या मुंबईतील अटल सेतूवर मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामूळे अटल सेतूवरून शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकुण १० तासांसाठी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली असून इतर वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यात द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापुर वाशी मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

Updated : 17 Feb 2024 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top