Home > News Update > कल्याण शिवाजी चौकात शिंदे गटाची तर काही अंतरावर ठाकरे गटाची दहीहंडी

कल्याण शिवाजी चौकात शिंदे गटाची तर काही अंतरावर ठाकरे गटाची दहीहंडी

कल्याण शिवाजी चौकात शिंदे गटाची तर काही अंतरावर ठाकरे गटाची दहीहंडी
X

आज संपूर्ण महाराष्ट्रात दहीहांडीचा जल्लोष सुरू आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील १५ वर्षांपासून शिवसेनेच्या शहर शाखेकडून दहीहंडी साजरी केली जाते. परंतू शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट यांच्याकडून वेगवेगळी साजरा होणारा दहीहंडी उत्सव साजरा करण्यास यंदा पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाने पोलीस आणि महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने सुनावणी करत शिंदे गटाला पोलिसांनी आधीच परवानगी दिली असल्याने आणि आता त्यात बदल करणे कठीण आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला गुरुदेव हॉटेल आणि कुबा रेस्टॉरंट यामधील जागेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन कारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज शिवसेना शिंदे गटाकडून शिवाजी चौक परिसरामध्ये मोठा जल्लोषा मध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे शिवाजी चौकाच्या काही अंतरावर गुरुदेव हॉटेल जवळ ठाकरे गटही दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत. दोन्ही दहीहंडी मध्ये शिंदे व ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन होणार आहे.

Updated : 7 Sep 2023 10:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top