Home > Max Political > भाजपला किंमत मोजावी लागेल-संजय राऊत

भाजपला किंमत मोजावी लागेल-संजय राऊत

भाजपला किंमत मोजावी लागेल-संजय राऊत
X

आज दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला.

‘महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे भाजपाला शिवसेने उभे केले, जागा दिली. शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक होती. मात्र आता भाजपाने शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलली आहे. भाजपाने युती तोडून आपला जुना आणि सर्वात मोठा मित्र पक्ष गमावला आहे. याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल,’

असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासोबत युती करण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती. मात्र, अमित शाह मातोश्रीवर आले आणि युतीबाबत बोलणी केली. असंही राऊत म्हटलं आहे..

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात ही भेट होती. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यातच शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवूनही सत्ता स्थापन केलेली नाही. शिवसेनेने युतीमध्ये सत्तेचे समसमान वाटप हे सूत्र समोर ठेवलं होतं. या सुत्रानुसार मुख्यमंत्री पद देखील समान तत्त्वावर असावं. असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळं शिवसेनेनं भाजपशी राजकीय फारकत घेतली आहे.

आता शिवसेना, कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सत्ता स्थापन करण्या संदर्भात शिवसेना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीने ने कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे.

मात्र, शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही असं सांगतिलं. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे.

काय म्हणाले संजय राऊत...

शरद पवार समजून घेण्यासाठी सर्वांना १०० जन्म लागतील,

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची पत्रकारांनी चिंता करून नये. महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार असून ते स्थिर राहिल

'शिवसेना मोठा पक्ष आहे, म्हणून सरकार स्थापनेविषयी शिवसेनेला जाऊन विचारा, हे म्हणणे चुकीचं नाही.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही गंभीर असून राज्यातील सर्वच खासदारांनी याप्रश्नी एकत्र यावे.

मोदींनी पवारांचं कौतुक केलं म्हणून काय झालं. पवार माझे गुरु असल्याचं मोदींना जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे, त्याचा राजकीय अन्वयार्थ निघत नाही. शिवसेनेच्या मनात कुठलाही गोंधळ नसून मीडियाच्याच मनात गोंधळ आहे.

Updated : 19 Nov 2019 5:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top