Home > News Update > आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हिपवरुन राजकारण

आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हिपवरुन राजकारण

आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हिपवरुन राजकारण
X

राज्यातील सत्तासंघर्ष वाढत असून शिवसेना (shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर व्हीपवरुन पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (SC)दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले असले तरी शिवसेना ( शिंदे गट ) प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांनी व्हीप बजावल्या ठाकरे- शिंदे संघर्ष वाढला आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाची सुरवात राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने झाली. तत्पुर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी म्हटलं की, “शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशन काळात हजर राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना हा व्हीप बजावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये, असं निर्देश दिले आहेत. पण, अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही. हा व्हीप आहे की सर्वांनी सभागृहात हजर राहावं.” असं म्हणाले.

गोगावलेंच्या व्हिपवर बोलताना गटाचे प्रतोद सुनील प्रभू म्हणाले, “आमच्या उपस्थितीसंदर्भात जो व्हीप बजावयाचा, तो आम्ही बजावणार आहे. ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत. शिंदे गटाच्या वकीलांनी न्यायालयात सांगितलं की, कोणताही व्हीप बजावणार नाही. मग, न्यायालयाला सांगूनही व्हीप बजावत असतील, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. न्यायालयाचा अवमान त्यांनी केला आहे, असं सांगू. न्यायदेवता आम्हाला न्याय देईन,” असं सुनील प्रभू यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

एकंदरीत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशन ठाकरे- शिंदे संघर्ष शिगेला पोचला असून आता संघर्ष आधिवेशन संपेपर्यंत अधिक तीव्र होईल असं दिसत आहे.

Updated : 27 Feb 2023 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top