Home > News Update > कोरोनाच्या संकटात विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम घोषीत

कोरोनाच्या संकटात विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम घोषीत

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असताना राजकीय दृष्ट्या अशा अंत्यत महत्वाच्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाने घोषीत केला आहे.

कोरोनाच्या संकटात विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम घोषीत
X

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्य तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका एप्रिल आणि मे महीन्यात पार पडणार असून पाचही राज्यांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर केला जाईल असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी जाहीर केले. हे विधानसभा निवडणुकांसंबंधी पत्रकार परिषदेला निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि राजीव कुमार हेदेखील या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत पाच राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे."एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत" अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. करोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या सांगत बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केलं असं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊनच या पाच राज्यांत निवडणुका पार पडतील असे त्यांनी सांगितले.

केरळमध्ये एकाच टप्प्यात होणार विधानसभेची निवडणूक होणार असून 6 एप्रिल रोजी मतदान 2 मे रोजी निकाल लागतील, आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान 27 मार्च होणार असून तामिळनाडूमध्ये पण एकाच टप्प्यात निवडणूक केरळ प्रमाणेच मतदान सहा एप्रिलला तर 2 मे ला निकाल लागतील. केरळ आणि तामिळनाडू एकाच दिवशी होणार आहे. पश्चिम बंगलामध्ये आठ टप्प्यात निवडणूक होणार असून 7 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान

तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीच्या निवडणुका एकाच टप्प्यात सहा एप्रिल रोजी, तर आसामची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी मेडिकल स्टाफसहीत सर्व करोना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.सण आणि उत्सव आणि केंद्रीय सुरक्षा पथकं उपलब्धतेनुसार निवडणुकांचं नियोजन केलं.शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षांचं वेळापत्रकही निवडणुकांसाठी लक्षात घेतलं होतं असं त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ही माझी शेवटची पत्रकार परिषद असेल. ३० एप्रिल रोजी मी निवृत्त होत आहे असे सुनील अरोडा यांनी शेवटी सांगितले.

पुदुचेरी निवडणूक कार्यक्रम

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल.

अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च

उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च

केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल

मतमोजणी – दोन मे

तामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम

तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.

अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च

उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च

केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल

मतमोजणी – दोन मे

केरळचा निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला

उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च

केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल

मतमोजणी – दोन मे

आसाम विधानसभा निवडणूक कार्यक्रम :

- आसाममध्ये तीन टप्प्यांत निवडणूक

- पहिला टप्पा : ४७ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान

- दुसरा टप्पा : ४९ जागांसाठी १ एप्रिल रोजी मतदान

- तिसऱ्या टप्प्यासाठी ४० जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ : २९४ मतदार संघ

- पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार.

- पहिला टप्पा : २७ मार्च रोजी मतदान पार पडेल

- दुसऱ्या टप्पा : १ एप्रिल रोजी मतदान होईल

- तिसरा टप्पा : ६ एप्रिल रोजी मतदान

- चौथा टप्पा : १० एप्रिल रोजी मतदान

- पाचवा टप्पा : १७ एप्रिल रोजी मतदान

- सहावा टप्पा : २२ एप्रिल रोजी मतदान

- सातवा टप्पा : २७ एप्रिल रोजी मतदान

- आठवा टप्पा : शेवटचा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडेल

करोना काळात या निवडणुका होत असल्याने प्रचारासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे आखण्यात आली आहेत.

– दारोदार प्रचाराची उमेदवारासह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.

– रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.

– संशयित कोविड रुग्णासाठी स्वतंत्र नियम असतील.

– निवडणूक अधिकार्‍यांचे लसीकरण झालेले असेल.

Updated : 26 Feb 2021 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top