भारतीय वंशाच्या शास्रज्ञाचा जगभर डंका, डॉ. आशुतोष कोतवाल यांनी लावला नव्या मुलकणांचा शोध
भारतीय वंशाचे भौतिकशास्रज्ञ डॉ. आशुतोष कोतवाल (dr. Ashutosh kotwal) यांनी हिग्ज बोसॉनच्या सिंध्दाला (Higs Boson Theory) आव्हान देत नव्या मुलकणांच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
X
भारतीय वंशाचे भौतिकशास्रज्ञ डॉ. आशुतोष कोतवाल यांनी हिग्ज बोसॉनच्या सिंध्दाताला आव्हान दिले. तर त्यांच्या नेतृत्वाखालील 400 शास्रज्ञांच्या चमूला डब्लू बोसॉनच्या मुलकणाचे (W boson search for radicals) अचूकतेने वस्तुमान मोजण्यात यश आले. तर कण भौतिकशास्राच्या मॉडेलने सुचवलेल्या वस्तुमानापेक्षा अचूकतेने वस्तुमान मोजण्यात डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या गटाला यश आले. तर त्यांनी मोजलेले वस्तुमान अधिक आहे. त्यामुळेच पदार्थांमध्ये आणखी एखाद्या नव्या मुलकणांचे अस्तित्व असू शकते, असे संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांनी सुचवले आहे.
डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या गटाने अमेरीकेतील फर्मी लॅबमध्ये पार्टीकल एक्सलरेटरमधून डब्लु बोसॉनच्या 42 हजार नोंदी केल्या. या नोंदींचा आधार घेत मुलकणाचे वस्तुमान सात सिग्मा इतक्या अचूकतेने मोजण्यात आले. त्यामुळे आशुतोष कोतवाल यांच्या गटाचे कौतूक होत आहे. तर हे संशोधन सायन्स या नियतकालिकात प्रसिध्द झाले. (Dr. Ashutosh kotwal invent new radicals)
कण भोतिकशास्राच्या स्टँडर्ड मोड्यूलमध्ये तीन प्रकारची बले असतात. त्यामध्ये चुंबकीय बले, क्षीण बले आणि तीव्र बले यांचा सामावेश होतो. तसेच आतापर्यंत ज्ञात असलेल्या सर्व मुलकणांचा यामध्ये समावेश होतो. मात्र प्रमाणित कण भौतिकशास्रामध्ये गेल्या चार पाच दशकात अनेक संशोधने झाली. झालेल्या संशोधनांना 30 ते 40 नोबेल पारितोषकही मिळाले. त्यामुळे कण भौतिकशास्राचा सिध्दांत बरोबरच आहे, असे गृहीत धरून संशोधन सुरू होते. मात्र त्याच्या दुसऱ्या बाजूवर सलग 27 वर्षे संशोधन केले. त्यानंतर डब्लु बोसॉनचे प्रमाणित करण्यात आलेले वस्तुमान होते त्यापेक्षा त्याचे वस्तुमान जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रमाणित मानांकणाला छेद गेला, असे मत डॉ. आशुतोष कोतवाल यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले.
कोण आहेत डॉ. आशुतोष कोतवाल?
डॉ. आशुतोश कोतवाल हे भारतीय वंशाचे भौतिकशास्रज्ञ आहेत. त्यांचे वडील हे रेल्वेत अधिकारी होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण खरगपूर, कोलकत्ता, लखनऊ, दिल्ली, मुंबई येथील शाळांमध्ये शालेय शिक्षण पुर्ण केले. तर त्यानंतर त्यांनी पेनसेल्विनिया या विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाल्याने प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी पेनसेल्विनिया विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यांतर आशुतोष कोतवाल यांनी अर्थिक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. यादरम्यान आशुतोष याचे भौतिकशास्राशी नाते घट्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात संशोधन सुरू केले. तर पुढे या क्षेत्रात संशोधन करून त्यांनी पीएचडी मिळवली.
डॉ. आशुतोष कोतवाल यांनी पीचएडी पुर्ण केल्यानंतर ड्यूक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र आत आशुतोष कोतवाल यांनी आपल्या संशोधनातून हिग्ज बोसॉनच्या सिध्दांताला आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा जगभर डंका वाजत आहे.