Home > News Update > अशोक चव्हाण यांचा विधान सभा सदस्यत्वाचा राजीनामा

अशोक चव्हाण यांचा विधान सभा सदस्यत्वाचा राजीनामा

अशोक चव्हाण यांचा विधान सभा सदस्यत्वाचा राजीनामा
X

माजी मुख्यमंत्री आणि नांदेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाला सुद्धा रामराम ठोकला असून दोन दिवसात पुढची राजकीय दिशा ठरविण्यात येईल असं म्हणाले आहेत.

चव्हाण यांनी राजीनाम्याचे निश्चित कारण दिले नाही. नुकताच अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले आहेत की "मी कॉंग्रेसचा जुना कार्यकर्ता आहे. मी कॉंग्रेसमध्ये पहिल्यापासून आहे पण आता मला वाटत की मी खूप काळ कॉंग्रेसमध्ये घातला आहे. तर आता मला नवीन पर्याय शोधण्याची गरज आहे. म्हणून मी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेल, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. दोन दिवसात विचार करून पूढची राजकीय दिशा ठरवली जाईल" असं अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेस पक्षाने तुम्हाला खूप काही दिले आहे, तरीही तुम्ही पक्ष का सोडताय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी म्हटले की, अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं हे खरं आहे, पण चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलंय. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने मला मोठं केलं असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केले नाही, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. विरोधी पक्षात असूनही राज्य सरकारने तुमच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला, यावर अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी म्हटले की, मी राज्याचा मंत्री असताना भाजपसहित सर्वपक्षीयांना विकासाच्या कामात मदत केली. मंत्री शेवटी सर्व राज्याचा असतो, एका पक्षाचा नसतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळात मी सर्वांना निधी दिला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ट्विट करत त्यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात "काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू" असा इशारा नाना पटोले यांनी दिल आहे

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक चव्हाण हे 2008 ते 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धोका बसला आहे

Updated : 12 Feb 2024 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top