Home > News Update > अशोक चव्हाण यांची विधानसभा अध्यक्षांशी भेट, काँग्रेसला रामराम ठोकणार?

अशोक चव्हाण यांची विधानसभा अध्यक्षांशी भेट, काँग्रेसला रामराम ठोकणार?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे

अशोक चव्हाण यांची विधानसभा अध्यक्षांशी भेट, काँग्रेसला रामराम ठोकणार?
X

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे congress ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ashok chavha यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. नुकतेच केंद्र सरकारने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला होता, ज्यामुळे चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे. राहुल नार्वेकर rahul narvikar यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन भूकंप येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.

आदर्श सोसायटी घोटाळा हा एक भूमी घोटाळा आहे जो 2010 मध्ये मुंबईत घडला होता. या घोटाळ्यात अनेक राजकीय नेते आणि अधिकारींवर आरोप करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्यावरही या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप राहीला आहे.

Updated : 12 Feb 2024 7:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top