Home > News Update > संसदेपाठोपाठ विधीमंडळाचेही आधिवेशन लांबणीवर?

संसदेपाठोपाठ विधीमंडळाचेही आधिवेशन लांबणीवर?

दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता लक्षात घेऊन संसदेपाठोपाठ विधिमंडळाचेही हिवाळी आधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

संसदेपाठोपाठ विधीमंडळाचेही आधिवेशन लांबणीवर?
X

सालाबादप्रमाणे नागपूर कराराला अधीन राहुन विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन नागपूरमधे घेण्यात येते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी आढावा घेतल्यानंतर मागील कामकाज सल्लागार बैठकीत नागपूरऐवजी मुंबईत ७ डिसेंबर घेण्याचे ठरले होते. मध्यंतरी

संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे गेल्यानंतर राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याची आता शक्यता आहे. ७ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन डिसेंबरऐवजी जानेवारीपर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुरुवारी ता.३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ आवारातील मंडपात दुपारी ३ वाजता कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.मुंबईतील सर्व व्यवस्था नागपूरला खास अधिवेशनासाठी हलवण्याऐवजी हिवाळी अधिवेशनच मुंबईत घेण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे खास अधिवेशनासाठी नागपूरला जाणार्‍या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता.

अधिवेशन आयोजित करण्यासाठी सरकारच्या वतीने नागपूर आणि मुंबईमध्ये आढावा घेण्यात आला होता . नागपूर मध्ये केवळ सुरक्षेसाठी प्राप्त 8000 पोलीस राज्याच्या इतर भागातून नागपूर मध्ये बोलावले जातात. विधिमंडळ आणि मंत्रालयाचा मोठा स्टाफ मुंबईतून खास अधिवेशनासाठी नागपूरला जातो.नागपुर मधील आमदार निवास कोविड सेंटरमधून वापरात होते . त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मुंबईचा घेण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला झालेल्या करारानुसार वर्षातील एक अधिवेशन हे नागपुरात घ्यावे अशी तरतूद आहे. आता विधीमंडळाचे आधिवेश पुढील वर्षी जानेवारी महीन्यात मु्ंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 1 Dec 2020 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top