Home > News Update > Asaduddin Owaisi : नावं बदलताच ओवैसींचा संताप

Asaduddin Owaisi : नावं बदलताच ओवैसींचा संताप

Asaduddin Owaisi : नावं बदलताच ओवैसींचा संताप
X

Asaduddin Owaisi News : महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयानं सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि धाराशिव या दोन शहरांची नावं बदलण्यात आली. यावरून AIMIM प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी (Asaduddin Owaisi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

खासदार ओवैसी म्हणाले, “ आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही”. महाराष्ट्रातील शिंदे सरकारनं मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला होता, त्याला केंद्रीय गृह मंत्रालयाने एका आदेशाद्वारे मान्यता दिली. त्यानंतर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्यात आलं आहे.

'नामांतराचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल'

शहरांची नाव बदलण्याच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले, 'सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील”. असे खासदार ओवैसी म्हणाले.

ओवैसी पुढे म्हणाले की, “आम्ही नामांतराविरुध्द यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनीही विरोध केला होता. आज सरकारकडं संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करत आहेत. ही हुकूमशाही आहे. आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असा टोलाही ओवैसी यांनी लगावला.

केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिलीये. नाव बदलाबाबत महाराष्ट्र सरकारच्या मागण्या केंद्र सरकारनं मंजूर केल्या आहेत, त्यामुळं आता औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे.

Updated : 25 Feb 2023 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top