Home > News Update > आर्यन खानच्या जामिनावर आज होणार सुनावणी

आर्यन खानच्या जामिनावर आज होणार सुनावणी

आर्यन खानच्या जामिनावर आज होणार सुनावणी
X

मुंबई : बॉलिवूडचा किंगखान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. आर्यन खान क्रुझ रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात तुरुंगात आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने मागील सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. NCB ने 14 ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीनाला विशेष एनडीपीए न्यायालयात विरोध केला आणि दावा केला की तो ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे.

NCB ने 3 ऑक्टोबरला आर्यनला अटक केली होती. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनी विशेष न्यायाधीश व्ही.व्ही पाटील यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी NCB चे म्हणणे मांडले. आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जचा नियमित ग्राहक होता हे दाखवणारे पुरावे आहेत, असे सिंह यांनी म्हटले होतं. यासह, त्यांनी आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप पुन्हा केला.

दरम्यान आर्यनच्या अटकेपासून, NCB म्हणत आहे की, त्याच्याकडून वैयक्तिकरित्या काहीही मिळाले नाही. मात्र, ड्रग्ज तस्करांशी त्याचे संबंध त्याच्या चॅटद्वारे उघड झाले आहेत.

जामीन न मिळाल्याने आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आले. आर्यन खानला कारागृहात त्याच्या घरातून ४५०० रुपयांची मनीऑर्डर मिळाली आहे. तसेच, तो कॅन्टीनमधून त्यांच्या आवडीचे अन्न आणि पेय मागवू शकतो. आर्यन खानला व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या पालकांशी बोलण्याची संधीही देण्यात आली आहे.

Updated : 20 Oct 2021 4:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top