Home > News Update > आर्यन खानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार; सायंकाळी 5 वाजेपर्यंत जामीन प्रक्रिया पूर्ण झाली नाही

आर्यन खानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार; सायंकाळी 5 वाजेपर्यंत जामीन प्रक्रिया पूर्ण झाली नाही

आर्यन खानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार; सायंकाळी 5 वाजेपर्यंत जामीन प्रक्रिया पूर्ण झाली नाही
X

मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर जामीन मंजूर झाला आहे. आज आर्यन खान 'मन्नत' वर जाणार होता, मात्र त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. आज जामीन प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आर्यनला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागेल आणि त्यानंतर उद्या सकाळी त्याची सुटका होईल. मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन आदेशाची प्रत विशेष एनडीपीएस न्यायालयात जमा करावी लागते. विशेष एनडीपीएस न्यायालय आरोपीच्या नावाने जामीन रक्कम किंवा सुरक्षिततेसाठी वैयक्तिक बाँड तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्यानंतर 'रिलीज ऑर्डर' जारी करतात. ही रिलीज ऑर्डर आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात येते. मात्र ही प्रक्रिया आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण झाली नाही. एखाद्या व्यक्तीसाठी प्रक्रियेेत बदल केला जात नाही असे आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री जुही चावलाने आर्यन खानच्या जामिनासाठी कोर्टामध्ये उपस्थित असून एक लाख रुपयांचा जामीन दिला आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खानची सुटका होणार आहे.

Updated : 29 Oct 2021 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top