पुण्यात बनावट RTPCR रिपोर्ट बनवणारे रॅकेट उघड
X
कोरोनाचे संकट गंभीर होत असताना आता लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने फसवणाऱ्या टोळ्यासुद्धा कार्यकर झाल्या आहेत. पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा डेक्कन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर अशोक हांडे ( वय 25) आणि दयानंद भीमराव खराटे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपीची नावे आहेत. आतापर्यंत केलेल्या चौकशीत या आरोपींनी १५ ते २० लोकांच्या कोविड आरटीपीसीआर चाचण्यांचे बनावट रिपोर्ट तयार करून दिले आहेत. मात्र ही संख्या जास्त असावी असा संशय पोलिसांनी आहे.
डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीनपॅथ डायग्नॉस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या लॅबच्या नावाने अज्ञात व्यक्ती कोविड आरटीपीसीआर चाचण्यांचे बनावट रिपोर्ट देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखीही काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता मान्यताप्राप्त लॅबमधूनच चाचणी करून खात्रीशीर रिपोर्ट घ्यावे, अ आवाहन पोलिसांनी केले आहे. दरमन्यान या आरोपींनी अजून काही इतर गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.