Home > News Update > अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या छिंदम बंधूना अटक

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या छिंदम बंधूना अटक

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या छिंदम बंधूना अटक
X

अहमदनगर : अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या भाजपाच्या माजी उपमहापौर, श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत यांना अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. नगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप

भाजपाच्या माजी उपमहापौर, श्रीपाद छिंदम याच्यासह त्याच्या साथीदारावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी हे फरार होते.

मागील काही दिवसांपासून छिंदम यांचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान काल रात्रीच्या सुमाराला ते नगर शहरामध्ये आले असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी माहिती दिली आहे. उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असून यामध्ये अजून दोन जणांना अटक पूर्व जामीन मिळाल्यामुळे त्यांचे देखील चौकशी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 15 Sep 2021 5:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top