Home > News Update > अर्णबमुळं भारताची आंतराष्ट्रीय नाचक्की?

अर्णबमुळं भारताची आंतराष्ट्रीय नाचक्की?

भंपक राष्ट्रवादाचा आव आणुन पत्रकारीता करणाऱ्या रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीचा खरा चेहरा व्हाट्सअप चॅटमुळं उघडकीस आला असला तरी या निमित्ताने अर्णबची भाजप जवळीक आणि प्रपोगंड्यामुळं भारताची आंतराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. पाकीस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे," असं विधान खान यांनी केलं आहे.

अर्णबमुळं भारताची आंतराष्ट्रीय नाचक्की?
X

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर मोठा भुंकप झाला झाला आहे. देशात विरोधी पक्षांकडून या संवादाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे," असं विधान खान यांनी केलं आहे.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही दोघांमध्ये संवाद झालेला आहे. या संवादाबद्दल पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे.

"२०१९मध्ये मी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट मोदी सरकारनं देशातील निवडणुकीसाठी बालाकोट संकटाचा वापर केला. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हे पत्रकार त्यांच्या तापटपणामुळे ओळखले जातात. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे. ज्यातून हेच दिसत आहे की, संपूर्ण खंडात अस्थिरता निर्माण होण्याच्या परिणामतेकडे दुर्लक्ष करून निवडणूक जिंकण्यासाठी हे धोकादायक लष्करी धाडस केलं केलं. पाकिस्ताननं बालाकोट संकट जबाबदारीनं टाळलं. तरीही मोदी सरकार भारताचं रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे," असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

"पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतीय प्रायोजकत्व, भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी १५ वर्षापासून चुकीची माहिती पसरवणारी मोहीम या चॅटमुळे उघडकीस आली आहे. आता भारतातील माध्यमांनी आपले संबंध उघड केले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाच्या टोकाकडे ढकलत आहेत," असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

"मी पुन्हा एकदा हे सांगतो की, माझं सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारच्या फॅसिस्टवादाविरुद्ध युद्धजन्य डाव उघडे पाडत राहिलं. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवा. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते," असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची संरक्षणविषयक संसदीय समितीकडून चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अर्नब गोस्वामीचं कोर्ट मार्शल करण्याची मागणी केली आहे.

माहीतीच्या अधिकार विषयक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अर्नब-गेट प्रकरणी देशदेद्राहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणतात, ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट हा भारताचा हेरगिरीविरोधी कायदा आहे ज्याची ब्रिटीश काळापासून अंमलबजावणी सुरु आहे. भारताविरूद्ध शत्रू राज्यास मदत करणार्‍या कृतीला दंड देण्याची यात तरतूद आहे.

या कायद्यानुसार, शत्रू राज्यास मदत करणे हे एखाद्या स्केच, योजना, अधिकृत गुपितांचे मॉडेल किंवा अधिकृत कोड किंवा संकेतशब्दांद्वारे शत्रूशी संवाद साधण्याच्या स्वरूपात असू शकते. या कायद्यांतर्गत शिक्षा तीनवर्ष ते जन्मठेपेपर्यंत आहे. या कायद्यांतर्गत खटला चालविण्यात येतो. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीवर ही कृती अजाणतेपणाने केली गेली असती तपी राज्याची सुरक्षा धोक्यात आणण्याचा हेतू नसल्यासही त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

या कायद्याचा कलम ५ अन्वये अर्नबला तत्काळ अटक करुन कारवाई केली पाहीजे अशी मागणी गोखले यांनी केली आहे.

अर्नबच्या चाटींगमधे पाकिस्थान सीमेवरील कारवाईची नोंद आहे. याचा अर्थ असा आहे की सरकारमधील एक वरिष्ठ व्यक्ती अति गोपनीय माहिती लिक करत आहे जी आपल्या सैनिकांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते पंरतू अर्नब गोस्वामी या माहीतीचा वापर टिआपरपी वाढविण्यासाठी करत आहे, हे गंभीर आहे, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं आहे.

अर्नब गोस्वामीनं मात्र नेहमीप्रमाणं गिरे भी तो टांग उपर अशी कृती करत पाकीस्तान परराष्ट्र मंत्रालय आणि कॉंग्रेसवर प्रत्युत्तरात टीका केली आहे.


Updated : 18 Jan 2021 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top