Home > News Update > मोठी बातमी : जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये अपघात

मोठी बातमी : जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये अपघात

मोठी बातमी : जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये अपघात
X

तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) लष्कराच्या हेलिकॉप्टरला (CHOPPER)अपघात झाला आहे. यामध्ये CDS (संरक्षण दल प्रमुख) बिपीन रावत (GEN. BIPIN RAWAT) यांच्यासह लष्कराचे काही ज्येष्ठ अधिकारी होते असेही वृत्त एनएनआयने दिले आहे. यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघाताची सविस्तर माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या कुटुंबाचेही काही सदस्य यामध्ये असल्याची माहिती मिळते. कोईम्बतू आणि सुलूर दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघाताच्या ठिकाणची काही दृश्य सध्या उपलब्ध झाली आहे. यामध्ये हेलिकॉप्टरला आग लागल्याचे दिसत असून काही जण आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे.

दरम्यान हवाई दलाने ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, IAF MI-17V5 या हेलिकॉप्टरला कुन्नूर येथे अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये CDS जनरल बिपीन रावत हे होते, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच हा अपघात कसा झाली याची

Updated : 8 Dec 2021 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top