Home > News Update > बुलडाण्यात सशस्त्र दरोडा; दुकानदाराची हत्या करून रोकड लुटली

बुलडाण्यात सशस्त्र दरोडा; दुकानदाराची हत्या करून रोकड लुटली

बुलडाण्यात सशस्त्र दरोडा; दुकानदाराची हत्या करून रोकड लुटली
X

बुलडाणा// बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानात घुसून तीन अज्ञात दरोडेखोरांनी तलवारीने व्यापाऱ्याचा गळा कापला. दुकानातील रोकड घेऊन पसार झाले आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर या दरोड्याच्या घटनेने चिखली शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिखली बसस्थानकासमोर मुख्य मार्गावर आनंद इलेक्ट्रॉनिक्स हे मोठे दुकान आहे. दुकानदार कमलेश पोपट (वय ५५) हे दिवसभरातील व्यवसायाचा हिशोब करीत होते. यावेळी चेहरे झाकलेले तीन जण दुकानाजवळ येऊन थांबले. त्यातील दोघांनी ग्राहक असल्याचे भासवून दुकानात प्रवेश केला. दुकानाचे एक शटर आतून बंद केले आणि धमकावले. यावेळी दुकानदार पोपट यांनी प्रतिकार केला असता त्यातील एकाने तलवार काढून सपासप वार केले. यात पोपट यांचा मृत्यू झाला. दुकानातील रोख रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले. हा घटनाक्रम सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. किती रक्कम लुटल्या गेली याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Updated : 17 Nov 2021 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top