Home > News Update > ताजमहल 'मंदिर' नव्हेच : माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा

ताजमहल 'मंदिर' नव्हेच : माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा

ताजमहल मंदिर  नव्हेच : माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा
X

ताजमहल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे . मुगल बादशाह शहाजहानने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या आठवणीत ताजमहल बांधला आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मियांची त्यावर तितकीच श्रद्धा आहे . पण याच वास्तूसंबंधी हिंदुत्ववादी गटांमधून चुकीचे दावे केले जात असल्याबाबतचे ट्विट आरटीआय चे कार्यकर्ते आणि पत्रकार साकेत गोखले यांनी केलं आहे .

आग्रा येथील ताजमहलातील 20 खोल्या उघडण्याची मागणी सध्या न्यायालयात करण्यात आली आहे. परंतु,न्यायालयाने यावरून याचिकाकर्त्याला फटकारलं असून जनहित याचिकेचा गैरवार करू नका असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. याबरोबरच ताजमहल की तेजोमहालय असा प्रश्न देखील सध्या उपस्थित होत आहे . यावर माहिती अधिकार नियम २००५ नुसार साकेत गोखले यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा,आग्रा यांच्याकडे माहितीचा अर्ज केला होता.त्यावर ताजमहाल हा मंदिराच्या जागेवर बांधलेला नाही आहे .








तसेच ताजमहालच्या आत मूर्ती असलेले कुलूपबंद कक्ष सुद्धा नाही आहे.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार हि माहिती अधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या माहितीची लोकांनी आणि न्यायालयाने दखल घेतली पाहिजे अशी आशाही साकेत गोखले यांनी व्यक्त केली आहे. देशात जातीय तेढ निर्माण करणारे हे मुद्दे असल्याने याच मुद्यांचा वापर करून भाजप आणि हिंदुत्व गट आणि प्रसारमाध्यम तणाव निर्माण करण्याचा दुष्ट मनसुबा बाळगतात, तो न्यायालय आणि जनतेने खोडून काढला पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 2 July 2022 11:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top