Home > News Update > कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करा डॉ. बाबा आढाव

कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करा डॉ. बाबा आढाव

कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; जुनी पेन्शन राज्य अधिवेशनात डॉ. बाबा आढाव यांचे प्रतिपादन

कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करा डॉ. बाबा आढाव
X

पुणे - महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम कष्टकरी कर्मचारी शासकीय नियम शासकीय बांधवांना त्यांच्या हक्काचे जुने पेन्शन योजना सरकारने लागू केले पाहिजे उतार वयात पेन्शन मिळणे हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे त्यामुळे सरकारने ती पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी अन्यथा कर्मचारी बांधावर रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची दखल सरकारने घेतली पाहिजे असे मत कामगार चळवळीचे अध्यक्ष नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी फुलेवाडा येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या अधिवेशनाचा उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.


देशातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून नवी एनपीएस ही योजना लागू करण्यात आली आहे ती योजना अन्यायकारक असून त्या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे हित नाही असा आरोप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे व सध्या या नव्या एनपीएस योजनेच्या विरोधात राज्यात आणि देशात कर्मचारी एकवटले आहेत व आंदोलने मोर्चे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात जुनी पेन्शन हक्क संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिले जुने पेन्शन हक्क अधिवेशन रविवारी पुण्यात फुलेवाडा येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन फुलेवाडा येथे डॉ.बाबा आढाव यांचा हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.




यावेळी कर्मचाऱ्यांच्या "एकच मिशन, जुनी पेन्शन" "पेन्शन आमचा हक्काची, नाही कोणाच्या बापाची" या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादीचे नेते व पुण्याचे माजी महापौर प्रशांत दादा जगताप बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने कोणतीही टाळाटाळ न करता लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, जुनी पेंशन ही मागणी पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात घेऊ असे आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. त्यांच्या या घोषणानंतर कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना प्रतिसाद दिला.

दरम्यान 1 नोव्हेंबर 2005 नंतर च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना मिळालीच पाहिजे. देशातील इतर राज्य जर जुनी पेन्शन योजना देत असतील तर महाराष्ट्र प्रगत व आधुनिक राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचं वक्तव्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष सागर शिंदे

यांनी केलं आहे.

प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे पुणे शहराध्यक्ष बाळकृष्ण चोरमले दुर्ग क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहुल शिंदे, पेन्शन बचाव कृती समितीचे राज्य अध्यक्ष संजय यवतकर यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यकार्याध्यक्ष जगदीश ओहोळ यांनी केले, सूत्रसंचालन अमोल गायकवाड व जालिंदर राऊत यांनी केले तर आभार शहाजी गोरवे यांनी मानले.

Updated : 18 Sep 2023 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top