Home > News Update > Apple iphone 13 ची बहुप्रतिक्षित सीरीज लॉन्च

Apple iphone 13 ची बहुप्रतिक्षित सीरीज लॉन्च

Apple iphone 13 ची बहुप्रतिक्षित सीरीज लॉन्च
X

जगप्रसिद्ध असलेल्या अ‍ॅपल कंपनीनं आयफोन13 सीरीज (Apple Event iphone 13) लॉन्च केली आहे. या सीरिजची सर्वांनाच प्रतीक्षा होती. जबरदस्त फीचर्ससह आयफोन13 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यात एकूण 4 फोन आहेत. या नव्या फोनमध्ये A15 बायॉनिक चिपसेट असल्याने हा फोन इतर फोनपेक्षा 50 टक्के अधिक वेगानं चालेल असा कंपनीने दावा केला आहे.

आयफोन13 मध्ये स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स ड्युएल कॅमेरा सिस्टम आहे, सोबतच हा फोन पाच रंगांमध्ये (गुलाबी, लाल, निळ्या, मिडनाईट, स्टारलाईट) उपलब्ध असणार आहे.

यामधीय ब्राईटनेस 28 टक्के जास्त असणार आहे. आयफोन 13 सीरिजमध्ये आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन13 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. या फोनमध्ये ओएलईडी आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय 6 कोर सीपीयू असणार आहे. आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये इतक्या क्षमतेचा सीपीयू देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राफिक्स वेगवान होणार. तसेच 15.8 ट्रिलियन ऑपरेशन प्रति सेकंद क्षमता असणार आहे .पॉवरफुल कॅमेरा सेटअपमुळे कोणत्याही परिस्थितीत उत्तम फोटो काढता येईल. फोनमध्ये आधीच्या तुलनेत जास्त चांगली बॅटरी असणार आहे. त्यामुळे ती आधीच्या तुलनेत 2.5 तास जास्त चालणार आहे असा दावा कंपनीने केला आहे8.

आयफोन 13 मिनीची किंमत 699 डॉलर; आयफोन 13 ची किंमत 799 डॉलर; आयफोन13 प्रोची किंमत 999 डॉलर, आयफोन 13 प्रो मॅक्सची किंमत 1099 असणार आहे.

Updated : 2021-09-15T06:52:17+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top