Home > News Update > अँटेलिया प्रकरण भोवलं : सचिन वाझे पोलिस दलातून निलंबीत

अँटेलिया प्रकरण भोवलं : सचिन वाझे पोलिस दलातून निलंबीत

पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या निलंबनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा डोक्यावर घेतली परंतू महाविकास विकास आघाडी सरकारनं त्यांची फक्त बदली केली. आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नं वाझेंना अटक केल्यानंतर नियमाप्रमाणं वाझेंना अखेर पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

अँटेलिया प्रकरण भोवलं : सचिन वाझे पोलिस दलातून निलंबीत
X

मुंबई अतिरिक्त आयुक्त (स्पेशल ब्रांच) यांच्या आदेशानुसार एपीआय सचिन वाझे यांना निलंबिनाची कारवाई करण्यात आले आहे. एनआयएने अँटेलिया संशयित कारमधील जिलेटीन कांड्या ठेवल्या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली आहे. त्याच अटकेनंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ४८ तास पोलिस कोठडी मिळाल्यानंतर राज्य सेवेतील कोणत्याही कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची तरदूत कायद्यात आहे.

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. सुरूवातीला ही कार कुणाची आहे? ही कार कुणी ठेवली? या सगळ्याची उकल झाली नव्हती. मात्र, विरोधी पक्षाने सभागृहात हे प्रकरण उचलून धरलं तेव्हा याबाबत एक-एक गोष्टी समोर आल्या.

त्यातच अँटेलियाबाहेरली स्कॉर्पिओ कार ही मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचंही समोर आलं होतं. पण ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुब्र्याजवळील खाडीत आढळून आला होता. याच प्रकरणी पहिल्यांदा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं. अखेर संपूर्ण प्रकरणी सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते.

13 तासाच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी एनआयएकडून अटक करण्यात आली होती. त्यांना आता २५ मार्च पर्यंत पोलिस कोठडी देण्याचा निर्णाय NIA कोर्टानं दिल्यामुळं सचिन वाझेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विधीमंडळात मागणी करुनही निलबंनाऐवजी फक्त बदलीची कारवाई करणारे महाविकास आघाडी सरकार एका प्रकारे या प्रकरणात आता तोंडघशी पडले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा नाट्याचा पहीला भाग असल्याचं सांगत दुसऱ्या भागात अनेक बडी नावं पुढं येतील असं सांगत सस्पेन्स वाढवली आहे.

Updated : 15 March 2021 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top